मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

कल्याणसिंह करताहेत मुस्लिम उमेदवाराचा प्रचार

आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यास जबाबदार असल्याचा कलंक भाळी असणार्‍या कल्याणसिंह यांना आता आपण मुस्लिमविरोधी नाही हे दाखविण्यासाठी आता मुस्लिम उमेदवाराचा प्रचारही करावा लागतोय. भाजपमधून समाजवादी पक्षात आलेल्या कल्याणसिंहांना आपली मुस्लिमविरोधी छबी अडचणीची ठरते आहे.

समाजवादी पक्षातून आणि बाहेरूनही त्यांच्या या छबीवरच प्रहार केला जात आहे. म्हणूनच आता श्री. सिंह अलीगड मतदारसंघातून उभ्या असलेल्या मुस्लिम उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. येथून सपाचे जाफर आलम निवडणूक लढवत आहेत. श्री. सिंह लोधी जातीचे आहेत आणि या मतदारसंघात या जातीच्या लोकांना ते आलम यांच्यासाठी मतदानाचे आवाहन करीत आहेत. हिंदू व मुस्लिम हे दोन्ही एकच आहेत, असेही ते या प्रचार सभांमध्ये सांगत आहेत.