केंद्रात भाजपचीच सत्ता येणार- सुषमा
केंद्रात भाजपचीच सत्ता येणार असून, पक्षाला बहुमत मिळत असल्याचा दावा भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी केला आहे.तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले बहुमत मिळाले असून, लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान बनतील असे सुषमा म्हणाल्या. छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब आणि राजस्थानात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.