सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

जळगावातील दोन्‍ही जागांवर भाजपा विजयी

जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे ए.टी.पाटील हे 98 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले असून त्‍यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खा. वसंतराव मोरे यांना पराभूत केले आहे. दोघेही पारोळा या एकाच गावातील रहिवासी आहेत.

निवडणुकीच्‍या तोंडावर राष्‍ट्रवादी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्‍या ए.टी.पाटील यांनी पदार्पणातच विजयाचा झेंडा रोवल्‍याने पक्ष कार्यकर्त्‍यांमध्‍ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

PR
तर रावेर मतदार संघातून भाजपचे विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे हे विजयी झाले आहेत. त्‍यांनी राष्‍ट्रवादीचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष रवींद्र पाटील यांना पराभूत केले आहे.