मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

डावे गरीबांना विसरले- राहूल गांधी

डाव्यांविरूद्धची आपली मोहिम सुरूच ठेवताना कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या आपल्या दुसर्‍या भेटीतही त्यांना लक्ष्य केले आहे. डावे राज्यातील गरीब, मागासवर्गीय व अल्पसंख्याकांना विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

गरीब, मागासवर्गीय व अल्पसंख्यांकाना विसरणारे हे कुठले कम्युनिस्ट सरकार असा सवाल करून हे सर्व पाहून आपल्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. पश्चिम बंगालचा हा माझा दुसरा दौरा असून, पहिल्यावेळी येथे आलो तेव्हा येथील सरकार गरीबांसाठी आहे, असे मला वाटत होते. पण आठ लाख जॉब कार्ड असूनही त्यातील केवळ साठ जणांनाच रोजगार मिळाल्याचे पिहल्यावर मला धक्काच बसला, असे राहूल म्हणाले. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे डाव्यांनी कौतुक केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात करण्यात मात्र ते अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.