सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

नितिश यांच्या पवित्र्याने 'कमलदल हलले'

'बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मोबदल्यात पाठिंबा देण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितिश कुमार यांच्या विधानाने भाजपचे 'कमलदल' हलले. कॉंग्रेसने लगेचच त्यांच्यासाठी 'हात' पुढे केला. मग भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेऊन 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला.

नितिश कुमार एनडीएपासून दूर होत असल्याची अफवा कॉंग्रेस पसरवत आहे. पण त्यात तथ्य नाही. नितिश एनडीएच्या बरोबर आहेत, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

बिहारला विशेष दर्जा देण्याची घोषणा लालकृष्ण अडवानी यांनी बक्सरमध्ये आयोजित एनडीएच्या सभेत केली होती याची आठवण देत भाजपचे सरकार केंद्रात आल्यास हे आश्वासनही पाळले जाईल, असे त्यांनी संगितले.

नितिश यांच्या मागणीवर कॉंग्रेस विचार करत असल्याच्या वृ्ताबद्दल बोलताना कॉंग्रेस पाच वर्षे सत्तेत असताना बिहारसाठी काहीही केले नाही, आता मात्र मदतीचे नाटक करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

नितिशकुमार बार्गेनिंगच्या पवित्र्यात