सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

निवडणूक आयुक्तांचे नाव मतदार यादीतून गायब

मतदार याद्यांमधील घोळाबाबतचे अनेक प्रकार उघडकीस येतात. परंतु या प्रकारानंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या...'
प्रकार प्रकार सुरु असतो. आता निवडणुकीच्या चौथ्या टप्यात चक्क मुख्य निवडणूक आयुक्तांचे नाव मतदार यादीतून गायब झाले. आता बोला...

मतदार यादीतून नाव गायब होणे हे आपल्या सारख्या सामान्य नागरिकांसाठी काही नवीन नाही. पण देशातल्या निवडणुकींचा आणि मतदार याद्यांचा डोलारा सांभाळणार्‍या मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकले. मुख्य निवडणूक आयोगाचे कार्यालय असलेल्या भवनातल्या 85 आणि 86 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मुख्य निवडणूक आयुक्तांच नाव असणे अपेक्षित होत. पण या मतदान केंद्रावरच्या यादीत त्याचे नाव मिळाले नाही. चक्क निवडणूक आयुक्तांचे नाव मतदार यादीत नसल्याने प्रशासन खडबडून जाग झाले. मतदान केंद्रावर असणार्‍या निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करुन चावला यांच्याकडून एक वेगळा अर्ज भरून घेतला. त्यानंतर नवीन चावला यांनी मतदान केले.