निवडणूक आयोगाची वेबसाइट ठप्प
लोकसभा निवडणूक निकालांचे 'ट्रेंड' सुरु झाल्यानंतर काही वेळातच निवडणूक आयोगाची वेबसाइट ठप्प झाली. यासाइटवर 'सर्व्हेर बिझी' असा संदेश येत होता.निवडणूक आयोगाने निकाल देण्याचा साइटबाबत मोठा गाजावाजा केला होता. यामुळे सकाळपासून अनेकांनी या साइटला भेट देण्याचा प्रयत्न केला. परंतु वेबसाइट ठप्प झाल्याने अनेकांचा अपेक्षा भंग झाला.