बूटा सिंग कॉग्रेसमधून निलंबित
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बूटा सिंग यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षादेश झुगारून सिंग यांनी बंडखोरी करत राजस्थानातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे कॉग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. सिंग यांना राजस्थानातील जालौर-सिरोही मतदार संघातून कॉग्रेस तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने त्यांना तिकिट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.