मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

मतदानासाठी साडे सहा लाख कर्मचारी

चौथ्या टप्प्यातील मतदान सात तारखेला होत असून, दिल्ली, बिहार, जम्मू- काश्मीरसह आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या मतदानासाठी देशभरातील साडे सहा लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम अडीचशे पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानाला आठ राज्यात सकाळी सात वाजता सुरुवात होणार असून, यात अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावत आहेत.

या निवडणूकीत 12 हजार गावातील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने त्या भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, बिहारमधील काही भागात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेण्यात येणार आहे.