सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

मायावती काय करणार याकडे आता लक्ष

बहूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी लोकसभा निवडणुकीनंतर कोणाला पाठिंबा देणारा यासंदर्भातले पत्ते अद्याप उघड केले नसले तरी त्या काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मायावतींचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आज या धावपळीतच दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

श्री. मिश्रा दिल्लीत तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांसह इतर पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी बसपची क़ॉंग्रेस नेत्यांबरोबर बैठक झाल्याचे बोलले जाते. मात्र, बसपने त्याचा इन्कार केला आहे. तिसर्‍या आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असे सध्या तरी एक्झिट पोलवरून दिसते आहे.