मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

मुन्नाभाईला 'पप्पी' महागात पडली

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना पप्पी आणि जादूची झप्पी देण्याची इच्छा बॉलीवूड स्टार आणि सपाचे सरचिटणीस संजय दत्त याला महागात पडले असून, अमर सिंह यांच्यासह मुन्नाभाई विरोधात उत्तरप्रदेशातील बिजनौर येथील पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 मे रोजी या दोनही नेत्यांनी समाजवादी पक्षाच्या प्रचारासाठी बिजनौर येथे सभा घेतली होती. यात संजय दत्त यांनी मायावतींना पप्पी आणि झप्पी देण्याची भाषा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

निवडणूक आयोगाने आज या दोन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आदेश दिल्यानंतर बिजनौर पोलिसांनी त्यांच्या विरोधात आचारसंहित भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.