सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

शंभर वर्षांच्या आजींनी केले मतदान

15 व्या लोकसभेसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत असून, मतदानाची टक्केवारी घसरल्याने राजकारण्यांच्या मनात धडकी भरली असली तरी मतदान करणाऱ्यांचा उत्साह कमी झाला नसल्याचे दिसून येत आहे.

हरियाणातील भिवानी येथील मतदान केंद्रावर आज 102 वर्षांच्या आजीबाईंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत मतदान टाळणाऱ्यांपुढ्यात आदर्श निर्माण केला आहे.

1952 मध्ये या आजीबाईंनी आपल्या मताचा प्रथम हक्क बजावला होता. आज 15 व्या लोकसभेसाठीही त्यांनी उत्साहात मतदान केले. आतापेक्षा आधीच्या काळातच राजकारणी चांगले होते असे सांगतानाच त्यांनी वर्तमान राजकारण्यांचे कान पकडले.