सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (16:28 IST)

Dog Funeral: वाजतगाजत काढली पाळीव कुत्रीची अंत्ययात्रा

Dog Funeral:कुत्रा हा आपल्या मालकाशी खूप प्रामाणिक असतो.माणूस आणि पाळीव प्राण्यांचं प्रेम अनेकदा बघायला मिळत. सध्या एका कुत्र्याशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे.पाळीव पाळीव कुत्रीच्या मृत्यू झाल्यानंतर एका कुटुंबाने त्याची मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेसाठी खास बॅंड पथकालाही बोलवण्यात आलं होत.या वेळी आपल्या पाळीव कुत्रीच शव मालकानं हातात घेतलं होतं. ओडिशामध्ये परलाखेमुंडी येथील एका व्यक्तीं त्याच्या अगदी जवळच्या एकनिष्ठ पाळीव कुत्रीला थाटामाटाने शेवटचा निरोप देण्यासाठी वाजतगाजत तिची अंत्ययात्रा काढली.

ओडिशामध्ये परलाखेमुंडी येथील टुन्नू गौडा यांचे त्यांच्या 'अंजली' नावाच्या पाळीव कुत्रीवर खूप प्रेम होतं. 17 वर्षानंतर एकत्र सहवासानंतर 'अंजली'चा मृत्यू झाला. 'अंजली' च्या मृत्यूनंतर गौडा कुटुंबाला खूप दुःख झालं .प्रामाणिक असलेल्या 'अंजली' वर गौडा कुटुंबियांचं विशेष प्रेम होतं. त्यांच्याशेजारी राहणारे लोकदेखील 'अंजली'वर प्रेम करत होते.आणि त्यांनी त्यानंतर या कुटुंबाने आपल्या लाडक्या कुत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी थाटामाटात अंत्ययात्रा काढण्यात आली, तसंच पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले. परलाखेमुंडीच्या रस्त्यांवर टुन्नू गौडा स्वतः हातात अंजलीचं शव घेऊन चालत निघाले. एका माणसाचं पाळीव कुत्र्यावर असणारं हे प्रेम पाहून अनेक लोकांचे डोळे पाणावले होते. 
या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. माणसाचं आणि कुत्र्याचं असं प्रेम पाहून लोकांचे डोळे पाणावले होते. सध्या या कुत्र्याच्या अंत्ययात्रेची चर्चा सर्वत्र होतं आहे.