बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (16:26 IST)

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारत विजयी

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा सामावेश झाला आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सर्वाधिक १८८ मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली.
 
१ जानेवारी २०१९ पासून तीन वर्षांसाठी भारताची या समितीवर निवड करण्यात आली आहे. गुप्त मतदानाने ही निवडणूक पार पडली. त्यात निवडून येण्यासाठी किमान ९७ मतांची आवश्यकता होती. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असले्लया १९३ देशांनी मानवाधिकार समितीतील नव्या देशांच्या सदस्यात्वासाठी मतदान केले. यापैकी १८८ देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले.
 
दरम्यान, आशिया-पॅसिफिक गटात भारताशिवाय बहरिन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाइन्स या देशांनीही दावेदारी सांगितली होती. मात्र भारताचं पारडं आधीपासूनच जड होतं. यापूर्वी भारत २०११-१४ आणि २०१४-१७ असा दोन वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे.