बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (17:07 IST)

10 रुपयांचे नाणे स्विकारले नाही, मग शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड

मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे. त्याला एका स्थानिक न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
 
याबाबत अधिक माहिती की, आकाश नावाच्या ग्राहकाने  अरुण जैन या दुकानदाराकडून 17 ऑक्टोबर 2017 रोजी दोन रुमाल खरेदी केले होते. त्याबदल्यात त्याने दुकानदाराला दहा रुपयांची दोन नाणी दिली होती. मात्र ही नाणी आता चलनात नाहीत, असे सांगून दुकानदाराने ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. वाद वाढल्यावर आकाश याने ही नाणी अजूनही चलनात आहेत आणि दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असा मुरैनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे असे वारंवार सांगितले. मात्र एवढे सांगितल्यावरही दुकानदाराने त्याच्याकडून नाणी स्वीकारली नाहीत.
 
या ग्राहकाने संबंधीत घटनेची माहिती पोलिसांना देऊन दुकानदाराविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी अरुण जैन या दुकानदाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेला दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यासंबंधीचा आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला.