रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:38 IST)

राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. येत्या 8 तारखेला राज आणि राहुल यांची भेट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या मध्यस्थीने ही राहुल-राज भेट होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयात किंवा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट प्रस्तावित आहे.
 
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांची जाहीर भाषणात स्तुती केली होती. भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तरं दिली होती. राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना एकप्रकारे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती. .
 
दुसरीकडे राज ठाकरे हे सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी-शहा जोडी आणि भाजपवर तुफान हल्ले चढवत आहेत.मात्र त्यांनी आजपर्यंत राहुल गांधींवर टीका करणारं व्यंगचित्र काढलेलं नाही.