शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (20:24 IST)

संस्कारी चोर: आधी हात जोडून 'देवी'समोर नतमस्तक, नंतर मंदिरातील दानपेटी घेऊन चोर पळाला

Sanskari Chor
मध्य प्रदेशातील जबलपूर येथून चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराने आधी देवीला नमस्कार केला, त्यानंतर दानपेटी घेऊन पळ काढला.
 
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोरी करण्यापूर्वी चोर 'देवी आई 'समोर नतमस्तक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तो मंदिराची दानपेटी सोबत घेऊन जातो. ही घटना जबलपूरच्या सुखा गावातील असून चर्चेचा विषय बनली आहे.
ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.