बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

World Water Day 2019: जगात आजदेखील 400 कोटी लोकांना पाण्याची कमी, एक चतुर्थांश भारतात

22 मार्च रोजी वर्ल्ड वॉटर डे असून संपूर्ण जागतिक लोकसंख्येत 400 कोटी लोकं असे आहेत ज्यांना आजदेखील पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नाही आणि आपल्या जाणून आश्चर्य वाटेल की यातील एक चतुर्थांश लोकं भारताचे आहे. 
 
आज जगातील जल संकट सर्वबाजूला व्यापलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात विकास होत आहे, जग औद्योगिकीकरण रस्त्यावर आहे परंतू स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी मिळणे आजदेखील कठिण आहे. जगातील एकूण भूजलाचा 24 टक्के भाग भारतीय वापरतात. देशात 1170 मिमी सरासरी पाऊस पडतो परंतू आम्ही केवळ 6 टक्के पाणी सुरक्षित ठेवू पातो.
 
एक रिपोर्टात भारताला चेतावणी देण्यात आली आहे की जर भूजलाचा शोषण थांबले नाही तर देशाला पाण्याच्या संकटाला सामोरा जावं लागू शकतं. 75 टक्के घरांमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध नाही. सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड द्वारे निर्धारित प्रमाणाच्या तुलनेत भूमिगत पाण्याचे 70 टक्के अधिक वापर होत आहे. 
 
जागतिक पाणी दिवस साजरा करण्याचा उद्देश्य जगातील सर्व विकसित देशांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आहे. हे जल संरक्षणाच्या महत्त्वावर देखील लक्ष केंद्रित करतं. या कार्यक्रमाचा उद्देश्य लोकांमध्ये जल संरक्षण महत्त्व, स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या महत्त्वाची जाणीव करवून देणे आहे.
 
भारताच्या संदर्भात महत्त्वाचे तथ्य देखील जाणून घ्या की भारतात दररोज गाड्या धुण्यासाठी कोटी लीटर पाणी खर्च केलं जातं. आणि दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या मेट्रोमध्ये पाइप लाइन्सच्या वॉल्व खराब झाल्यामुळे दररोज 17 ते 44 टक्के पाणी व्यर्थ वाहून जातं. आणि विचारणीय म्हणजे देशात अनेक महिला पाण्यासाठी दररोज सरासरी सहा किलोमीटरचा प्रवास करते.