शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (10:56 IST)

98 व्या वर्षीही योगसाधना

जगातील अन्य अनेक संस्कृतींप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृती लोप पावलेली नसून आजही ती जिवंत आहे इतकेच नव्हे, तर तिचा संपूर्ण जगभर प्रसार होत आहे. याच प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी म्हणजे योगविद्या. महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी असा अष्टांग योग सांगितलेला आहे. मुळात आध्यात्मिक अनुभूतीसाठी योगविद्या असली, तरी अर्वाचीन काळात शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठीही तिचा मोठाच उपयोग होत वयाच्या 98 व्या वर्षीही संपूर्ण निरोगी शरीराने योगसाधना करीत असलेल्या कोयंबतूरच्या नन्नामल यांच्याकडे आदर्श म्हणूनच पाहिले जात आहे. नन्नामल यांच्या जीवनात आजारांना थाराच नाही. त्या रोज नियतिपणे योगासने करतात आणि इतरांना शिकवतातही. त्यांना देशातील सर्वाधिक वयाच्या योगगुरू मानले जाते. वीसपेक्षाही अधिक कठीण आसनेही त्या या वयात लिलया करून दाखवतात. नन्नामल यांनी योगाचे शिक्षण आपल्या पित्याकडून घेतले होते जे एक वैद्य होते. आजही एखाद्या लहान मुलासारखे लवचिक असे त्यांचे शरीर आहे. त्या रोज पहाटे उठूनअर्धा लीटर पाणी पितात व मुलांना योगासने शिकवण्यासाठी बाहेर पडतात. फायबर आणि कॅल्शियमयुक्त असा साधा आहार त्या घेतात. त्याध्ये फळे आणि मधाचा समावेश आहे. रात्री सात वाजताच जेवून त्या लवकर झोपी जातात.