शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|
Last Modified: जैसलमेर , बुधवार, 1 एप्रिल 2009 (15:51 IST)

पैसे वाटपाचे जसवंतसिंहाकडून समर्थन

निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करताना कॅमेर्‍यात पकडले गेल्यानंतरही भाजपचे माजी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह घडल्या प्रकाराचे समर्थन करत आहेत. कॉंग्रेसच्या काळात गरीबांची मदत करणे पाप असेल आणि त्याच्याकडून उलट पैसे घेणे हा धर्म ठरत असेल तर अशा धर्माचे पालन आपण कदापि करणार नाही, असे 'बाणेदार' उत्तर देऊन आपल्याच कृत्याचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

अधर्म करायला लावणारी ही कसली आचारसंहिता असा सवाल करून जसवंतसिंह म्हणाले, मी स्वतः कुठलेही पैसे वाटलेले नाही. उमेदवारानेही पैसे वाटलेले नाही. तो मुळात तिथे नव्हताच. असे असताना आचारसंहिता तिथे लागू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी सफाई देऊन ते पुढे म्हणाले, मुळात वाटण्यासाठी पैसेच माझ्याकडे नाहीत. पण गरीबाच्या पोटाची आग विझवणे हा माझा धर्म आहे. माझ्या पूर्वजांनीही गरीबांची मदत केली आहे. त्यांच्याकडून काही घेतलेले नाही. मग असे करायला लावणारी ही कसली अधर्मी आचारसंहिता?

यासंदर्भात निवडणूक आयोगाला आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार केली जात असल्यास काही अडचण नाही. जे होईल ते पाहिले जाईल, असेही ते म्हणाले.