मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

अपक्ष निवडणुकीत घाण करतात- मनमोहन

भारतीय जनता पक्षावर टीका करता- करता आता पंतप्रधान मनमोहन सिंग हे अपक्ष उमेदवारांवर घसरले आहेत. अपक्ष उमेदवार निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचे काम करत असल्याने मतदारांनी त्यांना मुळीच भीक घालू नये असे आवाहन त्यांनी मुंबईत मतदारांना केले.

या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावण्यासाठी उतरले आहेत. त्यांना विजयाची मुळीच आशा आणि शाश्वती नाही, परंतु कॉंग्रेसची मतं फोडण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्‍यात आले असून, त्यांना मतदारांनी प्रोत्साहन देऊ नये असे मनमोहन म्हणाले.

राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना तोंड द्यावे लागत असल्याचे मान्य करत प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढल्याचे मनमोहन म्हणाले.