शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|

कॉग्रेस, भागोंपाच्या पदाधिकाऱ्यांचा राकॉपत प्रवेश

लोकसभा निवडणुकांपूर्वीच पक्षात बंड आणि फूट पडण्यास सुरुवात झाली असून, कॉग्रेस आणि भारतीय गोंडवाना पक्ष (भागोंप) मधील कार्यकर्त्यांसह इंडियन जस्टीस पक्ष आणि गोंडवाना मुक्ती सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

मध्य प्रदेशातील राकॉप उपाध्यक्ष आणि प्रवक्ते कॅप्टन व्ही पी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉग्रेसचे भोपाळ अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष हरीश गौर यांच्यासह चार उपाध्यक्ष, सचिव आणि सरचिटणिसांसह आठ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.