शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|

पवारांविरोधात भाजपची तक्रार

मालेगाव स्फोटातील आरोपींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांनी राज्याच्या मुख्य निवडणुक आयुक्तांकडे पवारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

साध्वी प्रज्ञा, आणि मालेगाव स्फोटातील आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर देशात कोठेही बॉम्ब स्फोटाची घटना घडली नसून, या दहशतवाद्यांना आर एस एसची मदत असल्याचे आरोप पवारांनी केले आहेत.