बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. कुंभमेळा
Written By वेबदुनिया|

अलाहाबादमध्ये आजपासून महाकुंभमेळा

WD
अलाहाबादमध्ये आजपासून महाकुंभमेळ्यास प्रारंभ होत आहे. या सोहळ्यासाठी सुमारे अकरा लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा गंगा-युमना-सरस्वती या नद्यांच्या संगमात पवित्र स्नान करण्यासाठी जवळपास 11 लाखांहून अधिक भाविक अलाहाबादमध्ये दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या सोहळ्याची तयारीही पूर्ण होत आल्याचे प्रशासनाने सांगितले मकर संक्रांतीच्या दिवशी अलाहाबादमध्या गर्दीचा उच्चांक होण्याचीही शक्यता आहे. सोमवारची मकर संक्रांत हे यंदाच्या कुंभमेळ्यातील ‍पहिले शाही स्नान असणार आहे.

सुमारे 54 चौरस किलोमीटर भागावरील महाकुंभ मेळ्यास देशभरातून, तसेच परदेशातूनही भावीक येणार आहेत. देशभरातील विविध भागांतून लाखोंच्या संख्येने साधू अलाहाबादमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या सोहळ्यास दहशतवादी लक्ष्य करणार असल्याची माहिती आयबीने दिली आहे. त्यानुसार येथील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेबरोबरच विविध सुरक्षा दलांना याठिकाणी पाचारण करण्यात आले आहे.