गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. कुंभमेळा
Written By वेबदुनिया|

कुंभमेळ्याच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

WD
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार, समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाले. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळ भरतो. 12 वर्षांनी एकदा होणार्‍या कुंभमेळ्याची परंपरा कित्येक वर्षांपासूनची आहे. याची सुरुवात कधीपासून झाली याची ‍माहिती उपलब्ध नसली तरी, 1870 पासूनच्या कुंभमेळ्याची दुर्मीळ चित्रे आणि छायाचित्रे मात्र बघतर येणार आहे.

कारण अलाहाबाद येथील परेड मैदानावर या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात छायाचित्रांबरोबच 1870 पासून आतापर्यंतच्या सर्व कुंभमेळ्याच्या आयोजनाचे 'रेकॉर्डस्' बघण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे आयोजन कसे केले जाते, कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटना या सर्वांची माहितीया प्रदर्शनात उपलब्ध आहे.

कुंभमेळ्यात आलेल्या परदेशी पर्यटकांस‍हीत इतर पर्यटकांसाठीही हे प्रदर्शन आकर्षण ठरत आहे.