शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. कुंभमेळा
Written By वेबदुनिया|

शाही स्नान: मुख्य आकर्षण

-महेश पांडे

WD
WD
कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाही स्नान असते. शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने अखाडे, साधु, संत व भाविक निघतात. दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यावेळी गंगानदीच्या काठावर मोठा जनसागर उसळत असल्याने प्रशासनाची कमालीची धांदल उडते. कार्यक्रमांच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शनही घडून येत असते. त्यातून सात्विक भावनाही प्रगट होतांना दिसतात. वैष्णवी अखाडे हे अठरा अखाड्‍याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. वैष्णवी अ अखाड्‍यातील 'महंत्त' ही पदवी प्राप्त करण्‍यासाठी नवोदीत संन्यास्याला अनेक वर्षांची सेवा करावी लागत असते.

वैष्णव अखाड्याची फार प्राचीन परंपरा आहे. नवोदीत साधु संन्यास ग्रहण केल्यानंतर तीन वर्षाची अथक सेवा करतात. तेव्हा त्यांना 'मुरेटिया' ही पदवी मिळते. त्यानंतर संन्यासी 'टहलू' पदास पात्र होत असतो. असे 'टहलू' संन्यासी महंतांची सेवा करतात. अनेक वर्षांची सेवा झाल्यानंतर 'टहलू' यांना 'नागा' ही पदवी मिळत दिली जाते. 'नागा' हे पद सांभाळणार्‍या साधुंवर अखाड्‍या संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात.

अखाड्या संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या सकुशल सांभळणार्‍या 'नागा' साधूला 'अतीत' ही पदवी म‍िळत असते. 'अतीत'नंतर पुजारी पदासाठी पात्र होत असते. 'पुजारी' झाल्यानंतर एखाद्या मंदिराची जबाबरादी यशस्वी पार पाडल्यानंतर पुढे जावून त्यांना 'महंत' ही पदवी प्राप्त होत असते.

शाही स्नान आटोपन आल्यानंतर साधु मंहत आखाड्याच्या माध्यमातून विविध कलाप्रकार प्रदर्शित करीत असता. ते पाहण्‍यासाठी भाविकांची गर्दी होत असते.

कुंभातील पहिला स्नान 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतला सुरू झाला असून 15 जानेवारीला मौनी अमावास्या, 20 जानेवारीला वसंत पंचमी, 30 जानेवारीला माघ पौर्णिमा, 12 फेब्रुवारीला महाशिवरात्र, 15 मार्चला सोमवती अमावास्या, 16 मार्चला गुढीपाडवा, 24 मार्चला श्री रामनवमी, 30 मार्चला चैत्र पौर्णिमा, 14 एप्रिल मेष संक्रांत व 28 एप्रिलला वैशाख अधिकमास पौर्णिमेला विशेष शाही स्नानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्यानंतर कुंभमेळ्याचा समारोप केला जातो.