नरवीर तानाजीचा 'सिंहगड'

sinhagargh
MH GOVT
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे सिंहगड. पुणे शहराच्या नैऋत्येला सिंहगड हा किल्ला आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर या उपरांगेवार आहे.भुलेश्वराची उपरांग पुण्याच्या दक्षिणेला असून ती पुर्व पश्चिम अशी धावते. या रांगेमध्ये सिंहगड, सोनोरी आणि दौलतमंगळ असे तीन किल्ले आहेत.

सिंहगड हा डोंगरी किल्ला असून याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्वाचे आहे. सिंहगडावर जाण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहे. पुर्वीच्या काळात सिंहगडावर जाण्यासाठी दक्षेणेकडील कल्याण दरवाजा मार्ग वापरण्यात येत असे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला कल्याण नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून हा मार्ग गडावर येतो. कोंढणपूर या पुर्व पायथ्याच्या गावातून दमछाक करणार्‍या वाटेनेही सिंहगडावर येता येते. उत्तरेकडील खानापूर येथूनही लांबच्या मार्गाने सिंहगडावर चढाई करता येते. सिंहगडावर जाणार्‍या या मार्गाशिवाय सर्रास वापरला जाणारा मार्ग म्हणजे उत्तर पायथ्याचा अतकरवाडीचा मार्ग.

पुण्याच्या दिशेला असल्यामुळे सिंहगडाच्या या दरवाजांना पुणे दरवाजे असे नाव मिळाले आहे. हे एका पाठोपाठ काही अंतरावर असलेले तीन दरवाजे आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधलेले हे दरवाजे कड्याच्या वर आहेत.

वेबदुनिया|
पहिला दरवाजा ओलांडून आपण दुसर्‍या दरवाजाकडे निघालो की डावीकडे तटबंदीमध्ये एक दिंडी दरवाजा (लहान दरवाजा) आहे. या दरवाजातून आत गेल्यावर आपण खंदकडा (खांदकडा ?) म्हणून असलेल्या भागात पोहोचतो. येथे तटबंदी व बुरुज आहे. हा सर्वात पुर्वेकडील भाग आहे. हा भाग बघून पुन्हा आपण दिंडी दरवाजातून येवून दुसरा दरवाजा ओलांडतो . येथून थोडीशी सपाटी आहे. या सपाटीच्या टोकाला तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाचे बुरुज मोठे आहेत. दरवाजा पुढील काही पायर्‍या चढताच उजव्या बाजूला बालदखाना नावाची इमारत आहे. कड्याजवळच ही इमारत असून अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...