गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

कोकण भ्रमंती : रमणीय स्थळ कुर्ली

Dhampur Lake kurli
महाराष्ट्र हा अनेक पर्यटनस्थळांची प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात प्राचीन, आधुनिक, तटीय स्थळे, बीच असे अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. जगाच्या पाठीवरून अनेक पर्यटक दरवर्षी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्राला भेट द्यायला येतात.  
 
हे खरे आहे की, लोणावळा, माथेरान, खंडाळा, महाबळेश्वर, मुंबई आणि पुणे सारख्या ठिकाणी देखील अनेक लोक येतात. पण महाराष्ट्रात कोकणात असलेले कुर्ली ही अद्भुत जागा अनेक जणांना माहिती नाही आहे. 
 
याकरिता आवाज आपण कोकणात असलेले कुर्ली मधील प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत. जिथे तुम्ही कुटुंब किंवा मित्रपरिवार किंवा पार्टनरसोबत नक्कीच मज्जा मस्ती करीत निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. 
 
कुर्ली- 
महाराष्ट्रात कुर्ली ला स्थानीय नागरिक कुरली नावाने देखील ओळखतात. हे सुंदर गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्र किनारी वसलेले आहे. जे आपल्या सौंदर्याने अनेक पर्यटकांना भुरळ घालते.
 
कुर्ली महाराष्ट्रातील कोंकण डिवीजनच्या दक्षिण पूर्व जिल्ह्यात येते. कुर्ली मुंबई पासून कमीतकमी 307 किमी आहे आणि कोल्हापुर पासून 91 किमी अंतरावर स्थित आहे. 
 
कुर्ली मधील विशेषतः म्हणजे येथील शांत वातावरण होय. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे गाव  नैसर्गिक सौंदर्य आणि आणि इथे बोलली जाणारी कोकणी भाषा तसेच पारंपरिक उत्सव हे पर्यटकांना आकर्षित करतात.  
 
कुर्ली गाव हे समुद्र किनारा, प्राचीन इमारत, महाल, किल्ला आणि सरोवर याकरिता प्रसिद्ध आहे. इथे अनेक लोक क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी येतात. 
 
कुर्ली बीच-
कुर्ली गावाला लागून असलेला अरबी समुद्राचा किनारा हा अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. इथे समुद्रावर येणाऱ्या शांत आणि मनमोहक लाटा पर्यटकांना अगदीच भुरळ घालतात. 
 
तसेच कुर्ली बीच आपल्या सौंदर्यतेने सोबत सूर्योदय आणि सूर्यास्त सारख्या मनमोहक दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. याकरिता संध्याकाळी इथे अनेक पर्यटक येतात. 
 
कुर्ली डॅम-
कुर्ली गावाच्या सीमेवर निर्मित कुर्ली डॅम हा अनेक पर्यटकांकरिता एक आकर्षण केंद्र आहे. कुर्ली डॅम जवळील हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. विशेष करून पावसाळ्यात पर्यटक आपल्या कुटुंबासोबत इथे येऊन निसर्गाचा आनंद घेतात. 
 
धामपुर सरोवर-
कुर्ली पासून 67 किमी अंतरावर स्थित धामपुर सरोवर हे कुर्ली जवळील आणखीन एक प्रसिद्ध ठिकण आहे. कमीतकमी 10 एकर मध्ये पसरलेले हे विशाल सरोवर पर्वतांनी घेरलेली आहे. धामपुर सरोवर हे  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पर्वतांमध्ये असलेले हे सरोवर खूप विहंगमय आहे. तसेच येथील हिरवळ प्रत्येकाला आकर्षित करते.
 
कुर्ली जावे कसे?
कोल्हापूर पासून कुर्ली हे गाव 91 किमी अंतरावर आहे. कोल्हापूरला आल्यानंतर तुम्ही कॅब किंवा बस ने या गावापर्यंत पोहचू शकतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या नंतर देखील कुर्ली येथे जाण्यासाठी अनेक खासगी वाहन उपलब्ध होतात.