रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (13:41 IST)

काळाराम मंदिर, नाशिक Kalaram Temple Nashik

kalaram temple nashik
काळाराम मंदिर हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे ज्यामध्ये रामाची मूर्ती स्थापित आहे. हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पंचवटीजवळ आहे.
 
हे मंदिर पेशवे सरदार रंगराव ओढेकर यांनी 1782 मध्ये नगारा शैलीत बांधले होते, जे सुमारे 1788 मध्ये पूर्ण झाले. मंदिरात काळ्या पाषाणापासून बनवलेली रामाची मूर्ती अवशेष आहे, म्हणून त्याला 'काळाराम' म्हणतात. ओढेकर यांना एके दिवशी स्वप्न पडले की गोदावरी नदीत रामाची काळ्या रंगाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांनी नदीतून मूर्ती आणली आणि हे मंदिर बांधले.
 
दुसर्‍या मान्यतेनुसार येथे पूर्वी नाथपंथी साधू राहत असत. असे म्हणतात की साधूंना या मूर्ती अरुणा-वरुणा नद्यांवर सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिरात ठेवल्या होत्या. त्यानंतर माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधण्यात आले. त्या काळात मंदिर बांधणीचा अंदाजे खर्च 23 लाख इतका आहे.
 
हे मंदिर 74 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद आहे. मंदिराच्या चारही दिशांना चार दरवाजे आहेत. या मंदिराच्या कलशाची उंची 69 फूट आहे. 
 
कलश 32 टन शुद्ध सोन्यापासून बनवलेला आहे. पूर्व महाद्वारातून आत गेल्यावर भव्य सभामंडप दिसतो, ज्याची उंची 12 फूट आहे आणि येथे चाळीस खांब आहेत. हनुमान येथे बसले आहेत. 
 
मंदिरात ते आपल्या लाडक्या रामाच्या चरणांकडे बघताना दिसतात. हे मंदिर पर्णकुटीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याचे सांगितले जाते, जेथे पूर्वी नाथपंथी साधू राहत असत.
 
नाशिक येथील या मंदिरात भगवान श्री राम यांच्यासह देवी सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती देखील काळ्या रंगाच्या आहेत. या वेगळेपणामुळे हे मंदिर काळेराम मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे.
 
नाशिकपासून दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीजवळ हे ऐतिहासिक मंदिर आहे. येथे चैत्र महिन्यात (मार्च-एप्रिल) रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
 
मंदिर दर्शनाच्या वेळा:
सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत मंदिर खुले असते. आरती दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी होते.
 
कसे पोहोचायचे
नाशिक मुंबईपासून 160 किमी आणि पुण्यापासून 210 किमी अंतरावर आहे. रस्त्याने- नाशिक शहर हे जवळपास प्रत्येक मोठ्या शहराशी रस्त्याने जोडलेले आहे. नाशिकपासून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
 
रेल्वे - नाशिक रेल्वे स्टेशन मंदिरापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे.
 
विमानाने- गांधीनगर विमानतळ सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटक बस, टॅक्सी किंवा ऑटो रिक्षाने मंदिरापर्यंत पोहोचू शकतात.