मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By मनोज पोलादे|

भिमाशंकर

शंकराच्या 12 ज्योर्तिलींगांपैकी एक भिमाशंकर. पुण्यापासून 110 किलो मिटरवर असलेल पश्चिम घाटात असलेले या ‍तिर्थ क्षेत्राजवळच भिमा नदीचेही उगमस्थान आहे.

असे मानले जाते की शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर शंकराला आलेल्या घामातून भिमा नदीचा उगम झाला.

भिमाशंकरचे हे देऊळ नागरा पध्दतीने बांधण्यात आले आहे. हे देऊळ तसे नव्या पध्दतीचे आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी 18 व्या शतकाच्या सुमारास बांधला. असे म्हणतात की शिवाजी महाराज या देवळात येऊन गेले आहेत.

महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते मंदिराच्या मागे मोक्षकुंड आहे. तसेच घनदाट जंगल आ हे त्यात दुर्मिळ असे पांडा (खार सारखा प्राणी) आहेत.

जाण्याचा मार्ग :
पुण्यापासून 120 कि.मी. तर खेडपासून 50 कि.मी. वर हे तिर्थ क्षेत्र आहे.