मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. कौल महाराष्ट्राचा
  3. झळा दुष्काळाचा
Written By

दुष्काळी भागात बांधकामांसाठी तूर्त पाणी देऊ नका

मुंबई - राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालाने राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण मराठवाडय़ासह राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर या भागात सुरू असलेल्या बांधकामांना दिल्या जाणार्‍या पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालाने हे आदेश दिले.