शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 22 ऑक्टोबर 2009 (10:12 IST)

आठवलेंना हवीत सात- आठ मंत्रिपद

ND
ND
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत असतानाच तिसऱ्या आघाडीची स्थापना करून कॉग्रेसला आव्हान देणाऱ्या रिपब्लिक नेते रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा कॉग्रेसचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. आपण कॉग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असून, रिपब्लिकन आघाडीला सात ते आठ मंत्रिपद देण्याची मागणी त्यांनी निकालापूर्वीच केली आहे.

राज्यातील निकालांचे चित्र स्पष्ट होत असून, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. यातच तिसऱ्या आघाडीचे काही उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा मागितल्यास आपण त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी या संदर्भात बैठक बोलावण्यात आली असून, यात आघाडीला पाठिंबा द्यायचा का नाही आणि कोणत्या अटींवर द्यायचा या संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.