शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By नितिन फलटणकर|

उमेदवारांच्या हालचाली टिपण्यासाठी २५० व्हीडीओ कॅमेरे

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी तसेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी २५० व्हीडीओ कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, जिल्हा आणि तालुकास्तरावर पोलिस अधिकार्‍यांची पथकेही तयार करण्यात आली आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात एकूण १८ लाख ८ हजार २१ मतदारांची नोंद करण्यात आली असून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २१७५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आह, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी पत्रकारांना दिली.

निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून केंद्रीय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या दहा तुकड्या मागविण्यात आल्या असून, आतापर्यंत २०० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कायाखाली कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.