देशमुखांची मागणी 'राष्ट्रपतींचे फोटो काढा'
राष्ट्रपती पुत्र राजेंद्र शेखावत हे अमरावतीतून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यामुळे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे फोटो निवडणूक होईपर्यंत सर्व सरकारी कार्यालयातून हटवण्याची मागणी कॉग्रेसचे बंडखोर नेते सुनील देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.अमरावतीतून शेखावत यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या देशमुख यांना डावलत कॉग्रेसने शेखावत यांना उमेदवारी दिली आहे. या भागात देशमुख यांचे मोठे प्रस्थ आहे. शेखावत राष्ट्रपतींचे पुत्र असल्याने निवडणूक आचारसंहितेनुसार ताईंचे फोटो काढण्याची त्यांची मागणी आहे.