नऊ वाजता लागणार पहिला निकाल
12
व्या विधानसभेसाठी राज्यात 13 तारखेला घेण्यात आलेल्या 288 जागांसाठीच्या मतमोजणीस आता अवघे 24 तास शिल्लक आहेत. उद्या (ता 22) सकाळी आठ पासून मतमोजणीस सुरुवात होणार असून, अनेक धक्कादायक निर्णय लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे. 1.12
लाख इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून 7.58 कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज्यातील इच्छुकांचे भाग्य या मतपेट्यांमध्ये बंदिस्त झाले आहे. या निवडणूकीत 1820 अपक्षांसह 3536 उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. यात 211 महिलांचाही समावेश आहे. राज्यातील 288 जागांसाठी 267 केंद्रांवर सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.