शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वार्ता|

भुजबळांच्या स्वप्नावर पवारांचे पाणी

PTI
PTI
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी कॉग्रेसला देण्यात यावे अशी मागणी करत मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वप्नावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पाणी ओतले आहे. कॉग्रेसला या निवडणुकीत अधिक जागा मिळणार असल्याने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार नसून, पक्षाला मुख्यमंत्रिपद नको असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी आणि कॉग्रेसमध्ये झालेल्या करारानुसार राष्ट्रवादी कॉग्रेसला सुरुवातीचे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे. त्यांच्या ही मागणी करून 24 तास लोटत नाहीत तोच पवार यांनीच ही मागणी अशक्य असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीपेक्षा कॉग्रेसने अधिक जागांवर निवडणुक लढवली असून कॉग्रेसच्याच जागा अधिक येणार असल्याने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.

मतमोजणीपूर्वीच एक्झीट पोलमध्ये आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, असेच होणार असल्याचे पवार म्हणाले.