शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|

मतदान चाचण्यांच्या निष्कर्ष जाहीर करण्यास बंदी

महाराष्ट्रासह हरियाना, अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची 13 ऑक्टोंबर रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांवर मंगळवारी (ता. 13) सायंकाळी पाचवाजेपर्यंत निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

निवडणुकी होत असलेल्या राज्यांमध्ये 11 ऑक्‍टोबर दुपारी तीन वाजल्यापासून मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात येऊ नयेत, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 9 फेब्रुवारी रोजीच निवडणूक आयोगाने या चाचण्यासंदर्भातले निकष जाहीर केले होते. त्यानुसार ही बंदी घालण्यात आली आहे.