राज, उद्धवमधील लढत दोन पक्षांमधील: मुंडे
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात प्रचारात रंगलेला कलगीतुरा हे वैयक्तीक नाही. ते दोन पक्षांमधील लढत आहे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी मांडलीराज आणि उद्धव प्रचारातून एकमेकांवर खरपूस टीका करीत आहे. त्यासंदर्भात 'मिट द प्रेस'मध्ये प्रश्न विचारले असता मुंडे यांनी सांगितले की, ठाकरे विरुद्ध ठाकरे असे हे भांडण नाही. तर ती दोन पक्षामधील लढत आहे. त्यातील एक आमचा सहकार पक्ष आहे तर दुसरा विरोधक आहे. भाजपला मनसेचा अजिंडा मान्य नाही, असे त्यांनी सांगितले.