दर्डा यांच्या प्रचारासाठी श्रेयस तळपदेचा रोड शो
औरगांबाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे यांचा बुधवारी रोड शो आयोजित करण्यात आला होता. त्याला तरूणांची मोठी गर्दी उपस्थित होती. वसंतराव नाईक महाविद्यालयापासून जालना रोडने निघालेला हा रोड शो सिडको एन ३, कामगार चौक, जयभवानीनगर, शिवाजी चौक, हनुमान नगर, पहाडे कॉर्नर मार्गे महारूद्र हनुमान मंदिराजवळ आला. तेथे या रोड शोचे रूपांतर एका छोटेखानी सभेत झाले. यावेळी श्रेयस तळपदे, आ. दर्डा, राधाकृष्ण गायकवाड, ऋषी दर्डा यांनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले.