शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई- , बुधवार, 7 ऑक्टोबर 2009 (10:47 IST)

बसपा वाढविणार मुंबईतील मतांची टक्केवारी

मुंबईत गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ५ : ३० टक्के मते मिळविण्यात बसपाला यश आले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत मतांची आकडेवारी १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी बसपा प्रयत्नशील असल्याचे, पक्षाचे मुंबई - ठाणे - कोकण प्रदेशाचे प्रभारी डॉ. सुरेश माने यांनी सांगितले. बसपा कुठल्याही पक्षाला मदत करीत नाही, मात्र त्या पक्षाची मदत घेत असतो, असे सांगत राज्यात सध्या बोलबाला असलेल्या तिन्ही आघाडयांच्या मदतील बसपा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात बसपाचा प्रभाव अधिक असून लोकसभा निवडणुकीत या भागातून आपल्या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगत या भागात बसपा पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. मुंबई ठाण्यातील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या उत्तर भारतीय समाजाचा आपल्या पक्षाला भरघोस पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मनसेपेक्षा अधिक मते मिळविण्यात बसपा यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमुद केले.

गृहराज्य मंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी पाहता महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर प्रश्नचिन्हच उभे राहते, असे माने म्हणाले. रिपाई गटातील पक्षांवर टीका करताना, राज्यात एकंदर २६ रिपाई गट आहेत, मात्र यांच्यापैकी एकाचीही स्वबळावर आमदार निवडून आणण्याची क्षमता नाही, असे डॉ. माने यांनी सांगितले.