मुख्यमंत्री म्हणतात राज ठाकरे म्हणजे 'बेडूक'
राज्यात पावसाचा जोर वाढल्याने आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आपल्या विरोधकांवर तोंडसुख घेताना याचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता चक्क मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली असून, राज पावसाळ्यातील बेडूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.नांदेड येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी राज ठाकरे आणि आपल्या विरोधकांना ही उपमा दिली. पावसात ज्या प्रमाणे बेडूक डोकं वर काढतात, त्याच प्रमाणे राज आणि आपले विरोधक डोके वर काढत काहीही आरोप करत असल्याचे ते म्हणाले. बेडकांना आपण फारसी किंमत देत नसल्याचे सांगत त्यांनी राज आणि आपल्या विरोधकांची खिल्लीही उडवली.