शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

हृदयनाथ मंगेशकर शिवसेनेत

महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांचा भावोजी आदेश बांदेकर पाठोपाठ आता ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. आपला यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केले आहे.

निवडणुकांमध्ये सेनेत प्रवेश करणाऱ्या सेलेब्रेटींची संख्या दिवसें-दिवस वाढतच आहे. झी मराठीच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आदेश बांदेकर यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाने आल्या पावली त्यांना विधानसभेची उमेदवारीही दिली आहे. यापूर्वी अनेक सेलेब्रेटींनी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला याचा फायदा होणार आहे.

बुधवारी रात्री हृदयनाथ मंगेशकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. यामागे आपला कोणताही राजकीय हेतू नसून, केवळ स्वा. सावरकरांच्या विचारांचा पक्ष असल्याने आणि शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्याने आपण सेनेत प्रवेश केल्याचे मंगेशकर यांनी स्पष्ट केले आहे.