रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकर संक्रांती 2024 : योग्य पूजा विधी

sankranti puja vidhi
भोगी
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते.
या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे.
देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी (पावटे, गाजर, हरभरे, वांगी इतर), ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत, गुळाच्या पोळ्या आणि मूग व डाळीची खिचडीचा बेत करावा.
या दिवशी सवाष्ण जेवायला बोलावावी. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा पोहोचता करावा.
 
संक्राती
या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे.
या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता.
नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा.
सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरावे.
असे पाच सुगड तयार करावे.
रांगोळी काढून त्यावर हे सुगड ठेवावे.
त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा.
नंतर किमान पाच सवाष्णींना वाण-वसा करावा.
या दिवशी हळदीकुंकू समारंभ करून तिळगूळ वाटावा.
प्रत्येकीला आवा म्हणून भेट वस्तू द्यावी.
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या दरम्यान हळदीकुंकू समारंभ, दान व तिळगूळ देऊ शकता.
 
किंक्रांत
संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी करिदिन असतो. ह्या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत. या दिवशी बेसनाचे धिरडे करून खावे.


इतर सण विधी
बोरन्हाण
मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीला आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करावा.
मुलाला काळे झबले शिवावे. 
मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालावे.
औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओतावे. 
सुवासिनींना हळदीकुंकू द्यावे. 
बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे मानले गेले आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालावे. 
या दिवशी नवीन जावयाला तिळगूळ देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे.