मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:35 IST)

मकर संक्रांती २०२१ शुभ मुहूर्त

या वर्षी १४ जानेवारी रोजी सकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे, म्हणून मकर संक्रांती गुरुवार १४ जानेवारीला साजरी केली जाईल.
 
ग्रहांचा राजा सूर्य यांचे मकर राशीत गुरुवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून १४ मिनिटांनी आगमन होत आहे. गुरुवारी संक्रांत असल्यामुळे नंद आणि नक्षत्रानुसार ही महोदरी संक्रांती मानली जाईल.
 
शास्त्रानुसार संक्रांतीच्या ६ तास २४ मिनिट आधीपासून पुण्य काळाची सुरुवात होते. म्हणून यावर्षी ब्रह्म मुहूर्तावर संक्रांतीचे स्नान, दान व पुण्य केले जाईल. या दिवशी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांचा वेळ संक्रांतीशी संबंधित धार्मिक कार्यांसाठी चांगला असेल. तसे, दिवसभर दान केले जाऊ शकते.