मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:24 IST)

मकर संक्रांती विशेष : आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हे 5 उपाय करा

मकर संक्रांती ला सूर्य धनु राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो. यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष योग जुळून येत आहे. या वर्षी संक्रांतीला पाच ग्रह एकत्र येत आहे.या मुळे या सणाचे महत्त्व वाढणार आहे. या दिवशी दान केल्यानं कित्येक पटीने चांगले फळ मिळणार.मान्यतेनुसार, या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं जीवनात सौख्य-आनंद आणि समृद्धी मिळते आणि आयुष्य निरोगी राहते. 
 
1 सूर्याची उपासना करा-
या दिवशी सूर्य देवाची उपासना करावी. सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्यमंत्राचे जप करा.तसेच लक्षात ठेवा की आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करू नये.
 
2 पवित्र नदीत स्नान करा -
या दिवशी गंगा नदीत किंवा इतर कोणत्याही नदीत स्नान करणे शुभ मानतात. या दिवशी आंघोळ करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. काहीही न खाता गंगेत स्नान केल्यावर दान करावे यामुळे आपल्याला दुपटीने फळ मिळेल.
 
3 या गोष्टींचा वापर करणे टाळा -
या दिवशी खिचडी दान करण्याची प्रथा आहे. म्हणून म्हणतात की लसूण, कांदा,मांसाहार आणि अंडी खाणे टाळावे. या दिवशी मद्यपान देखील करू नये. या दिवशी नशा करणे टाळावे. मद्य, सिगारेट, गुटका इत्यादी वापरू नये.
 
4 रागावर ताबा ठेवा -
या दिवशी बायकांनी केस धुऊ नये. रागावर ताबा ठेवा आणि इतरांशी चांगले व्यवहार करा. जेणे करून आपल्या मनाला आनंदी वाटेल आणि सकारात्मक ऊर्जा राहील. असे मानले जाते की या दिवशी घराच्या आत किंवा बाहेर झाडे कापू नये.
 
5 गरजू लोकांची  मदत करा -
मकर संक्रांतीच्या दिवशी एखादा गरीब भिकारी, साधू किंवा गरजू वृद्ध ला दारी आल्यावर रिकाम्या हाती पाठवू नये. आपल्या क्षमतेनुसार काही न काही दान द्यावे. जेवू घालणे शुभ मानले जाते.