गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (09:27 IST)

श्री मंगळ ग्रह मंदिरास कृषी पंप भेट

अमळनेर- येथील श्री मंगळ ग्रह मंदिरास एका भाविकानी दिनांक २५ जून रोजी कृषी पंप भेट स्वरूपात दिला.जामनेर येथील रहिवासी तथा मनी ऍग्रोचे मनीष किसन शर्मा यांनी श्री मंगळ ग्रह मंदिरात येऊन कृषी पंप भेट दिला. या कृषी पंपाचा उपयोग परिसरातील नर्सरी व झाडांना होणार आहे. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून श्री शर्मा यांनी हा पंप दिला. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील यांनी श्री शर्मा यांना मंदिराविषयीची संपूर्ण माहिती देत संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी त्यांच्या समावेत मंदिराचे सेवेकरी गणेश सपकाळे उपस्थित होते.