गंगा आरती Ganga Aarti Marathi
जय देवी जय देवी गंगाबाई ।
पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ।।
माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी ।
हरिसी पातक अवघष जग पावन करिसी ।।
दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी ।
हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ।।
पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलो ।
विषयांचे मोहाने त्यातचि रत झालो ।।
ज्याचे योगे दुष्कृत-सिंधुत बुडालो ।
त्यातुतिन मजला तारिसि ह्या हेतूने आलो ।।
निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी ।
क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी ।।
मत्संगतिजन अवघे तारियले त्वा की ।
उरलो पाहे एकचि मी पतितांपैकी ।।
अघहरणे जय करुणे विनवितसे भावे ।
नोपेक्षी मज आता त्वत्पात्री घ्यावेम ।।
केला पदर पुढे मी, मज इतुके द्यावे ।
जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावे ।।