मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

11-11-11 रोजी बारा एक्यांचा अद्भुत संयोग

ND
हजारो वर्षांनंतर 11 एक्यांचा अद्भुत संयोग घडून येत आहे. 11 नोव्हेंबर रोजी एक वेळ असा येईल जेव्हा 12 वेळा एका पंक्तीत 1 अंक दिसेल. ज्योतिषामध्ये 1 अंकाचे विशेष महत्त्व आहे, कारण 1 अंकाचा स्वामी सूर्य आहे व याच्या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे.

11 नोव्हेंबर 2011, दिवस शुक्रवार, कृष्ण पक्षाची प्रथमा तिथी, भरणी व कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी अंकांच्या जगात शताब्दीचा सर्वात महत्त्वपूर्ण संयोग निर्मित होत आहे. जेव्हा 11 तारीख, 11व्या महिनेच्या व्यतिरिक्त 11वा वर्ष देखील राहणार आहे. घड्‍याळीत जेव्हा 11वाजून11 मिनिट आणि 11 सेकंद होईल तेव्हा तारीख व वेळेच्या अंकांपासून बारा एक्यांचा निर्माण होईल.

ज्योतिषानुसार धर्म, अध्यात्म व ज्योतिष जगतात 11 नोव्हेंबरचे विशेष महत्त्व आहे. या तारखेत 1 अंकाचा दोनवेळा प्रयोग झाला आहे. 1 अंकाचा स्वामी सूर्य असून त्याला ग्रहांचा राजा म्हणतात. अंक 11चा मूलांक 2 आहे आणि 2 अंकाचे स्वामी चंद्र आहे. या प्रकारे अंक 11ला सूर्य आणि चंद्र दोघांचा आशीर्वाद प्राप्त आहे. तसेच तिथीत एकादशी तिथीचा विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णूची पूजा केली जाते.

जर 11-11-11चा जोड करून त्याचे मूलांक काढले तर त्याचा योग 6 येत आहे. या 6 अंकाचा स्वामी शुक्र असून या दिवशी शुक्रवारच येत आहे. शुक्राला सांसारिक सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक मानला आहे.

याच प्रकारे जर 11 नोव्हेंबरची तारीख आणि वेळेचा मूलांक काढला तर तो 3 येतो, या अंकाचा स्वामी गुरू आहे. गुरुला धार्मिक व आध्यात्मिक उन्नतीचा कारक मानण्यात आला आहे. या तारखेला सूर्य व चंद्रासोबत गुरू आणि शुक्राची विशेष कृपा प्राप्त झाली आहे.

या शताब्दी हा एकमात्रच दिवस असेल जेव्हा 12 अंकांचा संयोग घडून येत आहे. म्हणूनच 1 अंकाचा हा समुच्चय सुख आणि आनंद आणणार आहे.