11/11/11ला जन्म घेणाऱ्या बालकाचे भविष्य
या शताब्दीच्या 11 तारखेला 11व्या महिन्यात 2011मध्ये ठीक 11 वाजून 11 मिनिट व 11 सेकंदाला जन्म घेणारा बालकाचे मकर लग्न, वृश्चिक नवांश, मेष राशी, कृत्तिका नक्षत्र, प्रथम चरण व लोखंडाचा पाया असेल. त्याचे नाव 'अ' अक्षरावरून येत आहे. जन्माच्या वेळेस सूर्याच्या महादशेत मंगळाची अंतरदशा व शनीचे प्रत्यंतर आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ अष्टमात सिंह राशीत असल्याने मातेला पिडा राहण्याची शक्यता असून तिच्यासाठी कष्टकारी राहील. तसेच पैशाच्या बाबतीत अडचणींना सामना करावा लागेल. मंगळाची आय भावावर चतुर्थ स्वदृष्टिपडल्यामुळे आय प्राप्तीत अडचणी येतील. गुरू-चंद्रासोबत असल्यामुळे गजकेसरी योग बनत आहे पण गुरू वक्री असल्यामुळे त्याचा लाभ कमी मिळेल. लग्न व द्वितीय भावाचा स्वामी शनी नवम (भाग्य भाव)मध्ये मित्र (कन्या राशीचा) असल्यामुळे भाग्याचा साथ लाभून येणाऱ्या अडचणींवर मात करू शकाल. तृतीय (पराक्रम) व द्वादश भाव (व्यय)चा स्वामी गुरू वक्री असल्यामुळे फार मेहनत करावी लागेल तेव्हाच यश मिळेल. पंचम व दशम भावाचा स्वामी शुक्र एकादश भावात षष्ट भावाचा स्वामी बुध-राहूसोबत असल्यामुळे विद्येच्या बाबतीत परिश्रम केल्याने लाभ मिळेल. अष्टम भावाचा स्वामी दशम भावात असल्यामुळे व्यापार, नोकरी व पिताच्या बाबतीत थोड्या अडचणी येतील. एकूण सर्व ग्रहांची स्थिती बघितली तर असा निष्कर्ष काढण्यात येत आहे की येणाऱ्या बालकाच्या नशिबात संघर्ष आहे.