Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2011 (10:58 IST)
अभिषेक : हे वर्ष यशस्वी राहील !
IFM
चित्रपट रिफ्यूजीपासून आपले अभिनयाची यात्रा सुरू करणारा अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976ला मीन राशी चंद्र लग्नात झाला. जन्मापासूनच राजयोग असल्यामुळे अभिषेकाला वडिलांकडून अभिनयाची शिक्षा मिळाल्यामुळे बगेर कुठल्याही अडचणींना तोंड देऊन त्याला अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश मिळाला.
अभिषेकच्या पत्रिकेत पंचम घराचा स्वामी चंद्र मीन राशीचा असून लग्न घरात बसला आहे. तसेच राशी स्वामी गुरुपण सोबत असल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग बनत आहे. लग्नेश व केंद्रेशचा साथ केंद्र किंवा त्रिकोणामध्ये असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग बनतो म्हणून तुम्ही लक्ष्मीपुत्र आहात.
गुरुची पंचम स्थानावर उच्च दृष्टी पडल्यामुळे दैनिक व्यवसाय, मनोरंजन भावावर पडत आहे, पण शनी पंचमामध्ये कर्क राशीचा असल्यामुळे यश कमीच मिळतो. भाग्यावर उच्च दृष्टी व भाग्येश मंगळाचे भाग्याकडे बघत असल्यामुळे हा भाग्यशाली आहे.
WD
द्वितीय भावात मंगळाची राशी, मेषचा केतू असल्यामुळे प्रभावशाली आवाजाचे धनी आहे. कलेचा कारक शुक्र प्रभावशाली नसल्यामुळे हा वडिलांपेक्षा 50 टक्केपण यशस्वी ठरला नाही.
शनी-सूर्याचा समसप्तक योगपण चांगला नसतो. जो पर्यंत वडील असतील तो पर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. शनी-सूर्याचा समसप्तक योगसुद्धा पुत्र प्राप्तीत अडचणी आणतो. गोपाळ मंत्राचे अनुष्ठान करून संतानं प्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकता.
वर्तमानात गुरुचा गोचरीय भ्रमण मीनमध्ये आहे आणि तो मेष राशीतपण राहणार आहे, जी गुरुची मित्र राशी आहे. म्हणून या वर्षी यश मिळण्याची उमेद करू शकतो.